बीड जिल्हा कारागृह परिसरात मोठमोठे वृक्ष तोडून त्यांची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीस आली. रात्री दहाच्या सुमारास एका ट्रकमध्ये तोडलेले वृक्ष भरून नेले जात असताना काही पर्यावरणप्रेमींना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक अडवला. या वेळी एवढ्या रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करून वाहतूक का केली जाते? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी दाखल झाल