मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीच्या अनुशंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमीतीची बैठक मंगळवारी दुपारी दीड वाजता मुंबईत मंत्रालयात झाली. त्यावर बरेच विषयावर चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंदआबा पाटील या बैठकीत सहभागी झाले होते.