अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम जवळ आज पहाटे चार वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका इसमाच्या ई बाईकला अचानक आग लागली.. गाडीतून अचानक धूर निघत असल्याने प्रसंगावधान राखत या इसमाने गाडी सोडली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीय..या आगीमुळे पूर्ण गाडी जळून खाक झाली या आगीची माहिती मिळताच अग्निशामक विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत गाडीचे सर्व साहित्य जळून खाक झाले होते..