अकोला महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील कोंडवाडा क्रमांक दोनमध्ये जनावरांसाठी सिमेंट काँक्रिटीकरण नसल्याने गैरसोय होत आहे. जनावरांना चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे मनपा कोंडवाडा विभागाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा पुरवाव्यात, जेणेकरून जनावरांना चिखलाचा त्रास होणार नाही, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.