गेल्या ९ दिवसांपासून धुमडाक्यात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता असून लाडक्या बाप्पांना निरोप दिल्या जात आहे. यानिमित्त आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजे पासून फरशी भागातून भव्य गणेश विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली.अग्रस्थानी मानाचा लाकडी गणपती राहणार त्यानंतर, तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ,वंदेमातरम् मंडळ या मंडळानंतर सर्व गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.