वस्त्रनगरी इचलकरंजीत साडेचार दशकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात,इंदिरानगर आणि डॉ.झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीने भव्य सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विविध समाज घटकांनी एकत्र येत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला.गणेशोत्सवानंतर ही रॅली आयोजित करून मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा आणि पोलिस प्रशासनावरील ताण लक्षात घेतलेला आहे,याचे विशेष कौतुक कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले.