जैन मंदिरांमधील मूर्ती,दानपेट्या तील रक्कम तसेच घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आसाराम बापू पूलाजवळ ताब्यात घेऊन 3 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.चोरीतील दोघे जण चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून जाणार आहेत.त्यानुसार सापळा रचून पुलावर शिवा गोपाळ डोंगरे, विशाल बाळू सांगळे यांच्यासह त्यांचा साथीदार लकी भंडारे याला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना सरकार वाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.