सततच्या पावसामुळे झरपट नदी पुलियावर चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या असून एका बाजूने संपूर्ण संरचना खालच्या बाजूस दबली आहे. तरीसुद्धा नागरिक व दोन, तीन चाकी वाहनांची ये-जा सुरूच असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष (जनहित व विधी) पियूष धुपे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त यांना आज दि 28 आगस्ट सायंकाळी 5 वाजता निवेदन देण्यात आले.