औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा चोंडी येथील तरुण शेतकरी पिंटू बळीराम काळे वय 26 वर्ष हे शेतातून घरी पायी जात असताना औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर काठोडा चोंडी जवळ भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडवून पळून गेले ही घटना दिनांक २३ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली शेतकरी पिंटू काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटना समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्था नानिज अंबुलन्सला भ्रमणध्वनीवरून बोलावले व गंभीर जखमी शेतकरी पिंटू काळे यांना उपचारासाठी नेले