कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसांपासून हा कचरा उचलून नेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. कचरा उचलण्यासाठी जेसिबी हवा होता पण अगोदरच अनेक जेसिबिंची थकलेली बिले काढू नये असे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतला लेखी सांगितले होते व त्यामुळे या कामासाठी जेसिबी मिळत नव्हता. सरपंच हरेश गोठे यांनी सूर्यकांत कुंजीर यांना कचरा उचलण्यासाठी जेसिबी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता, त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली व त्वरित जेसिबी उपलब्ध करून दिला यामुळे कचरा उचलण्यास सुरुवात झाली.