तळेगाव दशासर हद्दीत शेतातील विहिरी मधील मोटार ,झटका मशीन ,आणि केबल चोरीला जाण्याच्या घटना घटनांमध्ये वाढ झाली होती. तेव्हा या घटनांना आळा घालण्यासाठी चोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी सज्जता दाखवली. गुप्त माहितीवरून संशयित राजा उर्फ राजेंद्र भदे वय वर्ष 26 राहणार आठवडी बाजार तळेगाव दशासर याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवी ची उत्तर दिले. नंतर त्यांनी साथीदारासह परिसरातील केलेले सर्व शेती साहित्य चोरीची कबुली दिली. नऊ प्रकरणांमध्ये सोळा विहिरीवरील मोटार जप्त .