दिनांक 28 ऑगस्ट रोजी माऊली तालुका मुखेड येथील व्यक्ती मौला नबीसाब शेख हे मौजे बेटमोगरा या शिवारामध्ये अडकलेले होते. संबंधित व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदी करण्यासाठी आले होते. सायंकाळी माऊली कडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्यामुळे पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यानी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बाहेर पडता आले नाही. त्यानी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिमतीने तिथेच थांबले. ही गोष्ट स्थानिक प्रशासनाला समजली तेव्हा उपविभागीय अधिकारी देगलूर यां