एका वयोवृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे सातच्या दरम्यान उघडकीस आली. मारोती गणपत आत्राम वय ५८ वर्ष राहणार आठमुर्डी असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.