लुखामसला येथील उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत 02 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोविंद बर्गेमृत्यूप्रकरणी पोलीस कोठडी संपल्याने आज आरोपी पूजा गायकवाड हिला बार्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले, कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पूजाला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.यापूर्वी गोविंद बर्गेच्यामेहुण्याने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी पूजाला अटक केली होती.