राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याने सदर प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मंगळवार,९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन हा विषय मांडला.राजू शेट्टी यांनी सूचवले की, सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा अथवा आठ पदरी करावा,राज्य सरकारवरचा खर्चाचा बोजा पडणार नाही.