गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे हसनाळ गावावर भीषण संकट ओढावले आहे.या महापुरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली असून सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.गावातील शेतजमिनी,जनावरांचे गोठे आणि स्थानिक पायाभूत सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्या आहेत.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केले आहे.