दिग्रस येथील अरुणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचा जलाशय पातळी तीनशे तीस पॉईंट पंच्याशी मीटर इतकी झाली आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता धरणाची सात वक्रव्दारे प्रत्येकी पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आली. धरणात येणाऱ्या पाण्याच्या ओघानुसार विसर्गात कमी-जास्त बदल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.