जिंतूर शहरात वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते विनोद आढे यांना पाठिंबा देण्यासाठी आज रविवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील बंजारा समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.