यावल शहरात पाचव्या दिवसाच्या बाप्पाला रविवारी मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे, यावल शहरातून भव्य अशी मिरवणूक सहवाद्य निघालेली आहे रात्री आठ वाजेपर्यंत ही मिरवणूक मेन रोडावर मुख्य मिरवणूक मार्गावर आलेली आहे, या मिरवणुकीत आमदार अमोल जावळे यांच्या वतीने भाविकांना शीतपेय वितरण केले जात आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून निर्माल्य संकलन देखील केले जात आहे.