लातूर -गणेशोत्सवात डॉल्बीच्या वापरामुळे नागरिक, शाळकरी मुले, तसेच आजारी व्यक्तींना होणारा त्रास आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. जिल्ह्यात **१६ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल** करण्यात आले असून, अनंत चतुर्थी दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या साथीनेच गणपती विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे स्पष्ट आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत केले.