इचलकरंजी शहरातील भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन पंचगंगा नदीत मोठ्या भक्तिभावाने केले.मात्र,वरद विनायक मंदिरामागे असणाऱ्या जॅकवेलजवळ काही गणेश मूर्ती विसर्जनानंतर नदीकाठावर विद्रूप अवस्थेत आढळून आल्या.ही बाब प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणताच,वंदे मातरम नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पुढाकार घेत आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी साडे 4 वाजेपर्यंत तब्बल १ हजार गणेश मूर्ती पुन्हा विधीवत पद्धतीने पंचगंगा नदीत विसर्जित केल्या.