ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावर विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे.अनेक ठिकाणी कारवाईला विरोध केला जात आहे. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये फौंजफाटा घेऊन अनेक ठिकाणी कारवाई केली जाते. आज सकाळच्या सुमारास मुंबईच्या भोलेनाथ नगर येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला प्रचंड विरोध केला. हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या.जीव गेला तरी चालेल पण घर तोडू देणार नाहीत असा इशारा दिला.