मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता पुन्हा एकदा मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार आहेत.त्यांना पाठिंबा देण्याकरिता खालापूर तालुका व खोपोली शहर सकल मराठा समाज बांधव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन खोपोली शहरात केले होते.