पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या व्यावसायिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना तपासातील कामांमध्ये अधिक निपुण बनवण्यासाठी आयोजित २० वा नागपूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२५, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.