थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील १६५ मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगारांचे ‘वीरुगिरी’ आंदोलन अखेर आज दि 23 आगस्ट सायंकाळी 4 वाजता मागे घेण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिय्या मांडून कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत मागण्या मान्य करून घेतल्या आहे. त्यानंतर आंदोलांची यशस्वी सांगता झाली आहे.