आज सोमवार दि २९ सप्टेंबर २०२५ रोजी पासुन तहसील कार्यालय लोहा समोर दिव्यांग महाविर गायकवाड यांनी विविध मागण्यांसंदर्भात आमरण ऊपोषण सुरू केले आहे. या उपोषणात त्यांच्या मागण्या यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग,मजूरदार, गोरगरीब, यांना तत्काळ घरकुल अनुदान बिल बॅक खात्यात जमा करावे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समीतीवर दिव्यांगांना सदस्यत्व तत्काळ देण्यात यावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात आज पासून आमरण ऊपोषण सुरू केले असल्याची माहिती आज दुपारी बाराच्या सुमारास गायकवाड यांनी दिली