रावेर तालुक्यात विवरे हे गाव आहे या गावातील रहिवाशी देवानंद तुकाराम पाटील वय ३९ मूळ रहिवाशी उटखेडा या तरुणाने आपल्या जुन्या घराच्या बाहेर लोखंडी एंगलला ठिबक नळीद्वारे गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.