इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर शिवतीर्थ येथून विसर्जन मिरवणुकीचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्वच गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात मिरवणुकीत भाग घेतला आहे. डॉल्बी साऊंड,लेसर शो,झांज पथक, ढोल-ताशा पथक,तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक सजली आहे.