भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील संदीप गजानन मदनकर वय 25 वर्षे हा तरुण दि. 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन कारधा येथे बेपत्ता असल्या बाबत तक्रार दिली होती. दरम्यान त्याचा शोध सुरू असताना दि. 31 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता दरम्यान येथे वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना एका तरुणाचे प्रेत दिसून आले सदर घटनेची माहिती कारधा पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले.