ठाणे शहराच्या लोकमान्य नगर पाडा क्र.1 येथे दाटीवाटीच्या वस्तीत असलेल्या अत्यंत धोकादायक इमारती तोडण्याची काम सुरू आहे. दाटी वाटीच्या वस्तीतल्या धोकादायक इमारती तोडताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत असूनही तरी इमारतींना हादरे बसत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये या कारणांमुळे चांगलाच वाद झाला आहे. तसेच कोणतीही सुरक्षेची काळजी घेत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.