घरफोडीतील सराईत आरोपीला ताब्यात घेऊन 67 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे.पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीतील सोने विक्रीसाठी एक इसम चुंचाळे शिवार येथे येणार आहे.सदर ठिकाणी सापळा रचून प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे याला ताब्यात घेऊन त्याला मदत करणारा त्याचा मित्र सूर्यकांत अहिरराव याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.