भंडारा जिल्ह्यातील ढोरप येथील योगराज वासुदेव टेंभुर्णे वय 40 वर्षे हे दि. 23 ऑगस्ट रोजी रात्रीला घराच्या मागे गेले असता त्यावेळी त्यांना सर्पदंस झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे अकस्मिक विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी योगराज टेंभुर्णे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी डॉक्टरी मेमोवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.