म्हसरूळ परिसरातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे पाण्याने भरलेल्या खादानामध्ये एकाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार चंदर नथू माळेकर वय 29 राहणार म्हसोबा वाडी, बोरगड याचा मृतदेह आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पाठीमागे भरलेल्या खदानामध्ये पाण्यात तरंगताना आढळून आला. म्हसरूळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास सुरू आहे.