कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. याच बापाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले. तसेच सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांची मुले आणि भाजपच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.