जयपुर लांडे फाटा पुलाजवळील शेत शिवारातून लघुदाब वीज वाहिनीचे 16 पोल वरील 3728 मिटर तार वजन 347 किलो 34700 रुपयाची अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता उघडकीस आली आहे. याबाबत सहाय्यक अभियंता सचिन मधुकरजी बावणकर यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, जयपुर लांडे फाटा पुलाजवळील शिवारातील शेतातील लघुदाब वीज 16 पोल वरील 3728 मिटर वजन 347 किलो 34700 रुपयाची मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.