बढे प्लॉट, नाचणगाव (पुलगाव), ता. देवळी, जि. वर्धा येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भुजाडे कुटुंबावर भीषण संकट कोसळले. घरांच्या भिंती कोसळून तीस वर्षीय किरण भुजाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच देवळी-पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.