निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत दारुच्या अड्ड्यावर पोलिसांनी एकाच वेळी केलेल्या कारवाईत २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जत करण्यात आला आहे. यामध्ये स्वतःच्या शेतात भट्टी लावण्यास मदत करणारा शेतकरीही आरोपी ठरला आहे. यप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामपूर पोलिसांनी पेटले, छडवेल व विटावे गावात हातभट्टी दारू गाळणे व विक्री सुरू असल्याची खात्री झाल्यावर दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५ ते दुपारी १२ वाजेदरम्यान तीन ठिकाणी छापे टाकले.