चोपडा तालुक्यात वेळोदे हे गाव आहे. या गावातील रहिवाशी ज्ञानेश्वर लोटन पाटील वय ४३ या इसमाने कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते. त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चोपडा व नंतर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.