परळी रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात अंबाजोगाई शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच त्या दिवशी बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी अंबाजोगाई शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी केल