हातकणंगले येथील बसस्थानकाजवळील साई कॉलनीत शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता परिसरात एका अनोळखी इसमाकडून दगडफेक करण्यात आली.या प्रकारामुळे संपूर्ण कॉलनीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाचे सूर उमटले आहेत.स्थानिकांच्या माहितीनुसार,सदर इसम परराज्यातील असून तो नशेच्या अवस्थेत कॉलनीतील काही घरांवर दगडफेक करत होता.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलावर्ग आणि लहान मुलांमध्ये घबराट पसरली.