मराठा आरक्षण आंदोलनाला उग्र वळण लागले असताना केज तालुक्यातील सतीश देशमुख या तरुणाने आपले जीवन गमावले होते. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. अशा कठीण प्रसंगी आमदार तानाजी सावंत यांनी पुढाकार घेत देशमुख परिवाराच्या मदतीला धाव घेतली आहे. तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची आहुती देणाऱ्या सतीश देशमुख हे होते.