अवघ्या काही दिवसांवर गणपती उत्सव, महालक्ष्मी सण आला आहे, परंतु मनपा सफाई कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते ऑगस्ट असे पाच महिन्यांची पेन्शन आणि चार महिन्यांचा पगार थकीत आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि पेन्शन तात्काळ अदा करा अन्यथा परभणी मनपा कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा मनपा कर्मचारी संघटनाच्या वतीने आज सोमवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.