कणकवली येथून लाल चिऱ्याने भरलेला ट्रक क्र. KA-C0457 निपाणीच्या दिशेने जात असताना,सरवडे गावाजवळील मालवे फाट्याजवळ चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भातशेतीत घुसला.ही घटना आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सकाळी घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.ट्रकमध्ये चालकासह आणखी एक जण होता.ट्रकचा वेग अधिक असल्याने व वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.