संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय जाहीर झाल्यानंतर दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला. आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.