उद्धट वागणूक तसेच मनमानी कारभार करणाऱ्या राळेगाव आगाराच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची 15 दिवसात बदली करा अशा मागणीचे निवेदन दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारला राळेगाव आगाराच्या चालक व वाहक यांनी नुकतेच आगार व्यवस्थापकांना दिले असून सदर वाहतूक निरीक्षकाप्रती रोष व्यक्त केला आहे.