वडगाव राजदी येथे नागरिक बसले रस्ता रोको व ठिय्या आंदोलनाला.तालुक्यातील वडगाव राजदी या गावांतील तसेच वडगाव बाजदी रामगाव, दिपोरी या गावांतील नागरिक रस्ता रोको व ठिय्या आंदोलनासाठी बसलेले होते. रामगाव पासून ते वडगाव राजदी पर्यंत व दिपुरी पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रेशर चे वाहन चालतात त्यामुळे रस्त्याची क्षमता दहा टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या त्या रस्त्यावरून दिवसभर ये जा करत असते. त्या कारणाने रस्ता हा पुरवठा हा खड्डामय झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे .