मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपोषणकर्त्यांची होत असलेली अवहेलना सहन न झाल्याने नितीन माणिक चव्हाण (रा. सुगाव, ता. अंबाजोगाई) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मराठा समाज हळहळून गेला आहे. या घटनेची माहिती समजताच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुगाव येथे जाऊन आज चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करताना या शोकांतिकेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.