दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कोट्या येथील तलाव फुटल्याने मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये पाणी येऊन अंदाजे 150 घरात पाणी गेले. या घरातील 250 लोकाना नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व शहरातील नागरीकाचे मदतीने तात्काळ मुखेड येथील जि.प.शाळा व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, प्रशासन नेहमी दक्ष असुन नागरिकांच्या मदतीसाठी सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे अशी माहिती मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी आज रोजी दुपारी साडेबारा वाजता दिली आहे.