सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात आज बुधवार दि 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरणाची ही घटना जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे घडली. सदर प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. अज्ञाताने कशाचे तरी अमिष दाखवून फुसलावून मुलीला पळवून नेले असेल अशी तक्रार बामणी पोलीसात देण्यात आले आहे.याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.