लोहा शहरातील देऊळ गल्लीतील ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दि १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ ते दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वासातच्या दरम्यान मंदिराचे मेन गेट व आतील गाभाराचे गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिराचे दानपेटीतील नगदी व पितळ, चांदिचे छत्र असा एकुण १ लाख ४३ हजार चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी घंटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.